रामनगर येथील कोविड लसीकरण केंद्रावर १३ हजार नागरिकांचे लसीकरण

रामनगर येथील कोविड लसीकरण केंद्रावर १३ हजार नागरिकांचे लसीकरण

डोंबिवली (प्रतिनिधी) : शिवसेनेचे डोबीवली शहर प्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या प्रयत्नाने रामनगर परिसरातील ज्ञानसाधना ज्ञानेश्वर हिंदी शाळेत महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सुरु करणात आलेल्या कोविड लसीकरण मोहीमेत तेवीस दिवसात सुमारे १३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. येथे प्रतिदिन शेकडोच्या संख्येत नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासना सोबतच लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेतेमंडळी देखील पुढाकार घेत आहेत. अशाच प्रकारे शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा रघुवीरनगर प्रभागाचे नगरसेवक राजेश मोरे, दत्तनगर प्रभागाच्या नगरसेविका भारती राजेश मोरे यांनी अथक प्रयत्न करीत महापालिकेच्या दत्तनगर नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने डोबीवली पूर्वेतील रामनगर परिसरातील ज्ञानसाधना ज्ञानेश्वर हिंदी शाळेत कोविड लसीकरण केंद्र ५ मार्चपासून सुरु केले होते. 

सदर लसीकरण केंद्रावर नागरिकांना सोशल डिस्टस्टिंगचे भान ठेवून रांगेत बसवण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यांचे योग्यरित्या लसीकरण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. त्यांच्या चहा-पाणी, अल्पोहाराची देखील येथे व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांचा देखील सदर लसीकरण मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दर दिवशी शेकडोच्या संख्येत नागरिक येथे लसीकरणाचा लाभ घेत आहेत. नागरिकांच्या आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने १३,००० नागरिकांचे लसीकरण करण्यात यश मिळाल्याची माहिती राजेश मोरे यांनी दिली आहे. कोरोना आजाराने आपल्याला त्रस्त केले आहे. या आजारातून सर्वजण मुक्त होऊया आणि कोरोनाला हरवूया, असा विशास त्यांनी व्यक्त केला आहे.