स्व. विजय पाटील स्मृती क्रिकेट चषक वाकळण संघाने जिंकला! 

स्व. विजय पाटील स्मृती क्रिकेट चषक वाकळण संघाने जिंकला! 

डोंबिवली (प्रतिनिधी) :
स्व. विजय पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवला गेला. यावेळी वाकळण विरुद्ध गौरीपाडा संघामध्ये रंगलेल्या सामन्यात वाकळण संघाने बाजी मारली. स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि खेळाडूंना स्मृती चषकासह घसघशीत रोख रकमांची पारितोषिके देण्यात आली

स्व. विजयदादा क्रिकेट क्लबच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात मंगळवारपासून क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वाकळण संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी फलंदाजी करताना गौरीपाडा संघाने ४० धावा ठोकल्या. त्याचा पाठलाग करताना वाकळण संघाने ४१ धावा करीत चषकावर आपले नाव कोरले. 

स्पर्धेच्या शानदार समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. वंडार पाटील, सुधीर वंडार पाटील, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष विनायक काळण, नगरसेवक जालिंदर पाटील, अँड. शर्मा, माजी नगरसेवक सुरेश जोशी, जे.सी कटारिया, रमेश साळवे, पंढरीनाथ पाटील, भगवान मढवी, गोविंद सोनके, किसन गायकर, रोहिदास गायकर, हरिश म्हात्रे, पंढरीनाथ गायकर, सानप मामा, बबन पावशे, लक्ष्मण पाटील, शाम संते, गणेश खेडेकर, समीर टेंभे, अशोक त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

स्पर्धेच्या विजेत्या वाकळण संघाला रोख २ लाख ९० रुपये व स्मृती चषक, उपविजेत्या गौरीपाडा संघाला रोख १ लाख ९० रुपये व स्मृती चषक तर देसाई व कोळेगाव संघाला अनुक्रमे तृतीय व चतुर्थ पारितोषिक ५० हजार ९० रुपयांची रोख पारितोषिक देण्यात आले. रवि म्हात्रे या फलंदाजांला मालिकावीर घोषित करतानाच दुचाकी देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाळाराम पाटील, उत्कृष्ट गोलंदाज संकेत गायकर, उत्कृष्ट फलंदाज बबलू पाटील यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. स्पर्धेत अर्धशतक झळकावलेल्या सहा खेळाडूंना स्मार्ट फोन देऊन गौरविण्यात आले. स्पर्धे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शशिकांत शिंदे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत, माजी आमदार रमेश पाटील आदींसह असंख्य मान्यवरांनी हजेरी लावली.