श्यामराव पेजे महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील

श्यामराव पेजे महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : 
श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ओबीसी आणि विशेषतः कोकणातील कुणबी समाजासाठी एक महत्त्वाचे महामंडळ म्हणून श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची ओळख आहे.

सदर महामंडळाची नोंदणी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत एक उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. विश्वनाथ पाटील हे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील रहिवासी आहेत. कोकणातील इतर मागासवर्गीय आणि विशेषतः कुणबी समाजाच्या विकासासाठी पाटील यांनी दीर्घकाळ काम केले आहे. या निवडीबद्दल इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी पाटील यांचे अभिनंदन केले.