फुटपाथ जेव्हा स्टेज होतो...

डान्स म्हटले की, गाणे आणि संगीत या दोन गोष्टी कंपल्सरी आल्या. मात्र टिटवाळा येथील चार वर्षांची सई पालकांसोबत बाजारात गेली असताना अचानक तिच्या मनात डान्स करण्याचा विचार आला. ती भाजी विक्रेत्यांच्या मागे असलेल्या फुटपाथवर गेली आणि तिने डान्स सुरु केला. आजूबाजूला कोणतेही गाणे वाजत नसताना, कुठलेही संगीत ऐकू येत नसताना तिचे पाय थिरकू लागले. नो सॉंग नो म्युझिक तिचा डान्स सुरु होता आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांच्या चेहेऱ्यावर तिचा डान्स पाहून हास्य उमटले!