टिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर  

टिटवाळ्यातील ऑनलाईन गणेश देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर  

टिटवाळा (प्रतिनिधी) : शिवसेना मांडा-टिटवाळा शाखेच्या वतीने आमदार विश्वनाथ भोईर व उपशहरप्रमुख किशोर शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सहसचिव अ‍ॅड. जयेश वाणी यांनी घरगुती गणेश देखावा स्पर्धेचे नुकतेच आयोजन केले होते. कोविड-१९च्या परिस्थितीत यावर्षी  एकमेकांकडे जाता येत नसल्याची अडचण लक्षात घेऊन अभिनव ऑनलाईन पध्दतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. 

स्पर्धेसाठी एका विशेष वॉट्सएपगृपची निर्मिती करुन मांडा-टिटवाळ्यातील देखाव्यांचे फोटो या गृपवर मागवण्यात आले. एबीपी माझाच्या माजी ग्राफिक्स कलाकर प्रिया कटके यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या घरी जाऊन व शासनाच्या शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन करुन बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम पुरस्कार रु. ५००१ वैभव शेलावले, द्वितीय पुरस्कार रु. ३००१ मयुरेश गजरे व प्रतीक गुरव यांना विभागुन तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस सुनंदा भांगरे व आकाश खराटे यांना देण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी उपविभागप्रमुख रेवनाथ पाटिल, उपशाखाप्रमुख मनिष चव्हाण, महेश एगडे, अक्षय स्वामी, अनिल राठेड, सिध्देश चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.