सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी महिलांनी पूढाकार घ्यावा- एम.एम. माळी

सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी महिलांनी पूढाकार घ्यावा- एम.एम. माळी

भिंवडी (प्रतिनिधी) : मूलगा आणि मूळगी यांच्यामधील भेदभाव नष्ट करण्यासाठी, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा. त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. याचबरोबर मूलीच्या अस्तित्वाचे महत्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मुलीकडे ओझे म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलताना दिसत आहे. देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचाही मोलाचा वाटा आहे. स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिलांनी आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे. अन्याय सहन न करता त्याविरोधात अवाज उठविला पाहिजे. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी महिलांनी पूढाकार घ्यावा, असे आवाहन भिंवडी दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधिश एम.एम. माळी यांनी खरीवली येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

भिंवडी तालूका विधी सेवा समितीच्या वतीने भिंवडी तालूक्यातील खरीवली येथील विवेकानंद पब्लिक स्कूल व ज्यूनिअर काँलेज येथे जागतीक कन्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती व्हावी या करिता कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधिश एम.एम. माळी यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांनी न डगमगता यश संपादन करून समाज जागृती, कायदेविषयक जनजागृती करावी, असे मत न्यायाधिश एच.वाय. कावले यांनी व्यक्त केले. 

यावेळी विवेकानंद पब्लिक स्कूल व ज्यूनिअर काँलेज संस्थेचे अध्यक्ष शाताराम अगिवले, जेष्ठ विधिज्ञ दिनेश्वर पाटील, अँड. धनजंय चौधरी, अँड. शर्मिला घोडविदे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.अँड यूवराज कदम अँड रोहीदास पाटील, रोटरी क्लब अंबाडी विभागाचे अध्यक्ष विकास जाधव आदी उपस्थित होते.