रिंगरूट रस्त्यामधील बाधितांचे पुनर्वसन केल्याशिवाय काम सुरु करू नये- नरेंद्र पवार

रिंगरूट रस्त्यामधील बाधितांचे पुनर्वसन केल्याशिवाय काम सुरु करू नये- नरेंद्र पवार

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिममधील दुर्गाडी चौक ते मांडा-टिटवाळा येथून रिंगरूट रस्ता जात आहे. सदर रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांची घरे महापालिका पाडणार आहे. घर खाली करण्याच्या नोटीस सर्व नागरिकांना दिलेल्या आहेत, मात्र रिंगरुट बाधित कुटुंबांना पहिल्यांदा घरे उपलब्ध करून देत त्यांचे पूर्णतः पुनर्वसन झाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली.

रिंगरूटमध्ये बाधित कुटुंबांना पुनर्वसन करताना त्यांच्या घराच्या मोबदला म्हणून पैसे नाही तर घरच दिले पाहिजे. घर बांधणी प्रकल्प (BSUP) च्या माध्यमातून बांधलेली हजारो घरे कल्याण पश्चिममध्ये तशीच उभी आहेत. त्यामध्ये सदर बांधितांची व्यवस्था करण्याची मागणीही पवार यांनी केली.

आपण केलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. यावेळी मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, प्रदीप सुपे, सुवर्णा पाटील, अनंता पाटील, शशिकांत पाटील, संदीप पाटील, भरत कडाली, बर्वे, कांबळे, आकाश पाटील, निर्मला गायकवाड, ॲड. संजय शभंरेकर आदी नागरिक उपस्थित होते.