पक्षी व निसर्ग संवर्धनातील ‘योगदान’

पक्षी व निसर्ग संवर्धनातील ‘योगदान’

टिटवाळा येथील योगदान फाऊंडेशन ही संस्था पक्षी संवर्धन आणि निसर्ग संवर्धनाचे काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे व त्यातील संसाधनाचे समतोल राखण्यासाठी कार्य केले जाते. बर्डलाईफ इंटरनॅशनल, रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड, जपानचे जंगली पक्षी सोसायटी आणि यू. एस. नॅशनल ऑडूबन सोसायटी यांचा प्रमुख भागीदार आहेत. या ग्रुपचे मुख्यालय केंब्रिज, यू.के. येथे आहे. 

बर्ल्डलाईफ इंटनॅशनलने आतापर्यंत ७५०० महत्वपूर्ण पक्षी क्षेत्र ओळखली आहेत. वर्ल्ड कन्झर्वेशन युनियनच्या पक्षांच्या अधिकृत यादीनुसार १०० पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच बर्ल्डलाईफ इंटरनॅशनल यांनी २०१५ पर्यंत १३७५ पक्षी प्रजाती रेडलिस्ट म्हणून धोक्यात असल्याबाबत इशारा दिला आहे. वाढते शहरीकरणामुळे मानवाने बरेचसे जंगल नष्ट करून त्या ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय केली आहे. या वाढत्या शहरीकरणामळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन वा आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पध्दतीमुळे घरट्यांची अनुपलब्धता, अन्नाची अनुलब्धता, शहरातील वाढते प्रदूषण यासारख्या अनेक कारणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 

स्थलातंरीत परदेशी पक्षांच्या अभयारण्यात अवैध मासेमारी समस्येने डोकेवर काढलेले आहे. नुकतीच कळालेली बातमी म्हणजे नाशिक नंदूरबार येथील पक्षी अभरण्यात अशा मासेमारीमुळे माशांच्या जाळ्यात गुरफटून वीस पक्षांच्या मृत्यू झाला होता. या घटनांमध्ये स्थलांतरीत कॉमन क्रेन पक्षांचा नाहक बळी जात आहे. नदीपात्रात पडत असलेल्या प्लास्टिक कचर्‍याने पक्षांना अन्न शोधणे कठीण होऊन बसते. याचे एक उदाहरण म्हणजे हडपसर येथील पुणे-सोलापूर महामार्गावर कवडी येथे पक्षी निरीक्षण स्थळ आज धोक्यात आले आहे. तेथील या कारणामुळे दिवसेंदिवस स्थलांतरीत पक्षांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले आहे. 

उन्हाळ्यात जलाशयात पाणी नसल्याने पक्षांसमोर खाद्याची मोठी समस्या निर्माण होते. छोटे किटक, शिंपले, मासे आदी पक्षांचे खाद्य आहे. मात्र जलाशयाची पातळी कमी झाल्याने पक्षांना खाद्य देखील मिळणे दुरापास्त होऊन बसते. जंगली व परदेशी पक्षांची पाणी व खाद्यासाठी वनवन भटकंती सुरू होते. पक्षांचे स्थलांतर ही पर्यावरण संतुलनासाठी अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे जलाशयाची अवस्था फारच गंभीर आहे. जंगले नष्ट करून इमारती उभारल्यामुळे नैसर्गिक वातावरण बिघडत चालले आहे. उद्योगासाठी तलावातील पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे जलाशयाकडे केवळ राजकारण म्हणून बघितले जाते. जलाशयावर मासेमारीसुध्दा जोरात सुरू आहे. अशातच पक्षांचे प्रमुख खाद्य असलेले मासे देखील कमी झाले आहेत.

पशु-पक्षांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. पक्षी संवर्धनाची बिकट समस्या उभी झाली आहे. पक्षी हे मनुष्यापुढे काहीही करू शकत नाही. त्यांना कुठलेही आव्हान देता येत नाही किंवा बोलून दाखवता येत नाही. पण त्यांनी त्यांची जागा ही मानवाला निवाऱ्यासाठी दिली. त्याच्यासाठी आता आपण काहीतरी करण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी मिळून आपले पक्षी नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी व निसर्ग सौदर्य टिकविण्यासाठी हातभार लावला पाहिजे. याच हेतूने योगदान फाऊंडेशन कार्यरत आहे.

योगदान फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन चव्हाण, सचिव रितेश कांबळे, कोषाधक्ष मनिष चव्हाण व त्यांचे सभासद एकत्र येऊन पक्षी संवर्धनाचे कार्य सुरू केले. एक सामाजिक कार्य म्हणून विविध शाळा, कॉलेजमध्ये जाऊन पक्ष्यांच्या उपयोगी पाण्याचे व खाद्यचे पॉट उपलब्ध करून दिले. पुष्कळ ठिकाणी पक्ष्याचे पॉट लावून पक्ष्यांसाठी पाणी व दाने उबलब्ध करून दिले आहेत. कडक उन्हाळ्यात पाण्याची सोय करून निसर्गावर असलेले प्रेम आपसूकच दिसून येत. लोकसहभातून आपण निसर्ग व पक्षी संवर्धन घडविण्यासाठी गावोगावी फिरून शाळेत जाऊन जनजागृतीचे धडे दिले आहेत. नुकतेच दोन शाळेत पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे दिसून आले. तेथील विद्यार्थी घरातून पाणी घेऊन येत असत. परंतु हे पाणी त्यांना दिवसभरासाठी पुरत नसे. त्यांची ही व्यथा व अवस्था पाहून शाळेला फाऊंडेशनच्या अंतर्गत वॉटर पुरीफाइड मशीन डोनेट केली. त्या शाळेनेसुद्धा या कार्याचे प्रशस्ती व अभिनंदन पत्र देऊन त्यांचा गौरव केला. 

योगदान फाऊंडेशनच्या या जनजागृतीने प्रेरीत होऊन एका मुलाच्या पाल्याने मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी येणार्‍या पाहुण्यांना पक्ष्याचे पॉट भेट म्हणून दिले. त्यामुळे अनेक निसर्ग संवर्धक घडविले. प्रत्येक माणसाला वाटते की, आपण या निसर्गासाठी काही तरी केले पाहिजे किंबहुना इच्छा असते. परंतु कामाच्या व्यापामुळे काहीच करता येत नाही. त्यांना वेळच पुरत नसल्यामुळे अनेकांनी बोलून दाखविले आहे. परंतु या संस्थेच्या पदाधिकारी यांनी दाखवून दिले आहे की, कामाच्या व्यापातूनही वेळ काढून आपण निसर्गसंवर्धन करू शकतो. आपल्याकडील पॉटद्वारे पक्ष्याने खाद्य व पाणी उपलब्ध करून दिले आहे. 

सध्या पावसाळा सुरू असल्याने योगदान फाऊडेशनमार्फत विविध ठिकाणी वृक्षरोपणाचे कार्य केले जात आहे. पक्षांना निवारा सोबत खाद्य उपलब्ध करून दिले तर पक्षांना अधिक सोयिस्कर होईल त्यामुळे फाऊंडेशनने यावेळी निसर्गप्रेमींना विविध फळांचे कलमे व वनस्पतींचे कलमे जे खाद्यबरोबर निवारा देऊ शकतील त्यामुळे निसर्गासोबत पक्षीसंवर्धन सुध्दा केले जाईल अशा विचाराने वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.  नुकतेच टिटवाळा जवळील रुंदे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन फाऊडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृक्षरोपण केले. शाळेचे मुख्याध्यापिका भारती वाघ यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांच्या कार्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाने निसर्गाप्रती प्रेम दाखविले तर निसर्ग संवर्धनाचा उपक्रम एकत्र यशस्वी करू शकतो, अशी भावना योगदान फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सर्वांनी वेळात वेळ काढून निसर्गाचे जतन करण्यास हातभार लावावा व आपल्यात दडलेला पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमी जतन करावा असे आवाहनही फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.