पिसवली येथील तरुणांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश

पिसवली येथील तरुणांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्वेतील पिसवली प्रभागातील अनेक तरुणांनी आम आदमी पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केला. त्यांना पिसवली प्रभागात पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष अॅॅड. धनंजय जोगदंड यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले.

आपच्या कल्याण पूर्व येथील काटेमानीवाली नाका येथील मुख्य कार्यालयात झालेल्या एका बैठकीत पिसवली येथील अनेक कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जोगदंड यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी पिसवली प्रभाग अध्यक्षपदी दिपक झा, सचिवपदी सागर घुले, उपाध्यक्षपदी आशिष जगताप यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. धनंजय जोगदंड यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.